अभ्यासपूर्ण लेखन, विवेचन आणि प्रवचनमाला
भगवद्‌गीता, मनोबोध, उपनिषद, शंकराचार्य, गुरुदेव रानडे, योगी अरविंद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, समर्थ रामदासस्वामी, दासबोध, शबरी, विदुर, गोवंश सुधार .....
भगवद्‌गीता
गीता हा एक अदभुत ग्रंथ आहे. कुणा मानवाने केलेले हे परमेश्वराचे स्तवन नाही, तर प्रत्यक्ष परमेश्वराच्या मुखातून उच्चारलेले हे मंत्र आहेत. हा केवळ हिंदूंचा धर्मग्रंथ नाही तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी केलेला हा उपदेश आहे. धनुर्धर अर्जुनाने विचारलेले प्रश्न आणि योगेश्वर श्रीकृष्णाने त्याला दिलेली समर्पक उत्तरे अशा.....
समर्थ रामदासस्वामी
स्वत: समर्थ असूनही “रामाचा दास” म्हणवून घेणारे १७ व्या शतकातील तेजस्वी महापुरुष! छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू! प्रपंच व परमार्थ यां दोहोंची सांगड कशी घालावी यां विषयी समाजाला प्रबोधन केले. आत्माराम, दासबोध, मनाचे श्लोक ही समर्थ संप्रदायाची प्रस्थानत्रयी आहे. भिक्षाटनाच्या.....
आद्य शंकराचार्य
हिंदुत्वाचा अभिमानबिंदू म्हणून ज्यांच्याकडे आदराने बघावे असे जगद्गुरु आद्य शंकराचार्य ईश्वरी कार्य करण्यासाठी ते अवतरलेले होते. वेदांत धर्माचा कोंडमारा झाला होता, अशा काळात संपूर्ण भारतभूमीमध्ये पदभ्रमण करून त्यांनी अद्वैतधर्म पुनरुज्जीवित केला. धर्मसेनेचे संरक्षण करण्यासाठी भारताच्या चार दिशांना.....
योगी अरविंद
वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत मातृभूमीपासून दूर लंडन मध्ये वास्तव्य होते. भारतीय भाषा, संस्कृती, योग परंपरा यांच्याशी थोडादेखील संबंध आलेला नसताना पुढे “महायोगी” म्हणून ओळखले गेलेले थोर महापुरुष म्हणजे श्री. अरविंद! इंग्रज सरकारच्या जुलूम जबरदस्तीचा निषेध म्हणून काही काळ क्रांतिकारकाची जहाल.....
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात जनजागृती करणाऱ्या तुकडोजी महाराजांना त्यावेळचे राष्ट्रपती मा. राजेंद्रप्रसाद यांनी राष्ट्रसंत ही पदवी दिली. “देश सुधारायचा असेल तर आधी गाव सुधारले पाहिजे” या विचारधारणेतून त्यांनी मार्गदर्शक अशी “ग्रामगीता” लिहिली. सामान्यांचे उद्बोधन, समाजसुधारणा, देशभक्तिपर.....
गुरुदेव रानडे
तत्त्वज्ञानातील सिद्धांत समजावून घेताना त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ति झाली. लहान वयापासून उपजत बुद्धिमत्ता होतीच, त्यातच वयाच्या १५ व्या वर्षी ‘भाऊसाहेब उमदीकर’ या सद्गुरूंचा अनुग्रह लाभला. बौद्धिक सामर्थ्याला दैवाची जोड मिळाली आणि उत्तरोत्तर झपाट्याने प्रगति होत गेली. अलाहाबाद, पुणे, सांगली येथे विद्यादानाचे.....
About Madhavee Raghuveer
“ज्ञानभास्कर”
आद्य शंकराचार्यांच्या जीवन प्रवास
लेखिका
  • “ज्ञानभास्कर” -आद्य शंकराचार्यांच्या जीवन प्रवास, तत्त्वज्ञान व स्तोत्ररचनांवर आधारित पुस्तकाच्या लेखिका.
  • तत्वज्ञान व संस्कृत विषयातील पदवीधर.
  • पुणे मुलींची अंधशाळा येथे २२ वर्षे संस्कृत व भाषा विषयांचे ऑनररी अध्यापन.
  • गेली २० वर्षे ‘गीता धर्म मंडळ , पुणे या संस्थेशी संबंधित अनेक स्पर्धा व उपक्रमांचे संयोजन व परीक्षण करतात.
  • टिळक विद्यापीठाच्या संस्कृत परीक्षांच्या संयोजन व परीक्षणात सहभागी.
  • कोथरुड भागामधे गेली १६ वर्षे गीता संथा वर्ग व इतर अध्यात्मिक शैक्षणिक वर्गांचे आयोजन, गीतेतील विविध अध्यायांवर व निरनिराळ्या विषयांवर निरूपण करतात.
  • गीता धर्म मंडळाच्या संपूर्ण गीता कंठस्थ स्पर्धेच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. गीतेव्यतिरिक्त अनेक विषयांवर प्रवचनमाला आहेत.
  • मनोबोध, उपनिषद, शंकराचार्य, गुरुदेव रानडे, योगी अरविंद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, समर्थ रामदासस्वामी ,दासबोध , शबरी, विदुर , गोवंश सुधार विषयांवर प्रवचनमाला आहेत.
  • महाराष्ट्रातील नांदेड , नागपूर ,बारामती , कराड, पंढरपूर ,खोपोली, रोहा , देवरुख , जळगाव येथे व्याख्यान - प्रवचने झाली आहेत.
  • महाराष्ट्राबाहेर गोवा , उज्जैन ,हैद्राबाद इ, श्री. अरविंद आश्रमातर्फे पॉंडेचरी , नैनिताल व हृषीकेश येथे ७-७ दिवसांची स्वाध्याय शिबिरे.
  • पुरस्कार
    गीता कंठस्थ पुरस्कार - शृंगेरी शंकराचार्य यांच्याकडून.
    वाणी वैभव - ज्ञानमयी संस्था, पार्थ सखा गीता धर्म मंडळ, यशोमंगल - गिरगाव
  • मानपत्र - श्री . अरविंद आश्रम