माधवी रघुवीर
Introduction
Home
>
Introduction
About Madhavee Raghuveer
“ज्ञानभास्कर”
आद्य शंकराचार्यांच्या जीवन प्रवास
लेखिका
“ज्ञानभास्कर” -आद्य शंकराचार्यांच्या जीवन प्रवास, तत्त्वज्ञान व स्तोत्ररचनांवर आधारित पुस्तकाच्या लेखिका.
तत्वज्ञान व संस्कृत विषयातील पदवीधर.
पुणे मुलींची अंधशाळा येथे २२ वर्षे संस्कृत व भाषा विषयांचे ऑनररी अध्यापन.
गेली २० वर्षे ‘गीता धर्म मंडळ , पुणे या संस्थेशी संबंधित अनेक स्पर्धा व उपक्रमांचे संयोजन व परीक्षण करतात.
टिळक विद्यापीठाच्या संस्कृत परीक्षांच्या संयोजन व परीक्षणात सहभागी.
कोथरुड भागामधे गेली १६ वर्षे गीता संथा वर्ग व इतर अध्यात्मिक शैक्षणिक वर्गांचे आयोजन, गीतेतील विविध अध्यायांवर व निरनिराळ्या विषयांवर निरूपण करतात.
गीता धर्म मंडळाच्या संपूर्ण गीता कंठस्थ स्पर्धेच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. गीतेव्यतिरिक्त अनेक विषयांवर प्रवचनमाला आहेत.
मनोबोध, उपनिषद, शंकराचार्य, गुरुदेव रानडे, योगी अरविंद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, समर्थ रामदासस्वामी ,दासबोध , शबरी, विदुर , गोवंश सुधार विषयांवर प्रवचनमाला आहेत.
महाराष्ट्रातील नांदेड , नागपूर ,बारामती , कराड, पंढरपूर ,खोपोली, रोहा , देवरुख , जळगाव येथे व्याख्यान - प्रवचने झाली आहेत.
महाराष्ट्राबाहेर गोवा , उज्जैन ,हैद्राबाद इ, श्री. अरविंद आश्रमातर्फे पॉंडेचरी , नैनिताल व हृषीकेश येथे ७-७ दिवसांची स्वाध्याय शिबिरे.
पुरस्कार
गीता कंठस्थ पुरस्कार - शृंगेरी शंकराचार्य यांच्याकडून.
वाणी वैभव - ज्ञानमयी संस्था, पार्थ सखा गीता धर्म मंडळ, यशोमंगल - गिरगाव
मानपत्र - श्री . अरविंद आश्रम