About Madhavee Raghuveer
“ज्ञानभास्कर”
आद्य शंकराचार्यांच्या जीवन प्रवास
लेखिका
  • “ज्ञानभास्कर” -आद्य शंकराचार्यांच्या जीवन प्रवास, तत्त्वज्ञान व स्तोत्ररचनांवर आधारित पुस्तकाच्या लेखिका.
  • तत्वज्ञान व संस्कृत विषयातील पदवीधर.
  • पुणे मुलींची अंधशाळा येथे २२ वर्षे संस्कृत व भाषा विषयांचे ऑनररी अध्यापन.
  • गेली २० वर्षे ‘गीता धर्म मंडळ , पुणे या संस्थेशी संबंधित अनेक स्पर्धा व उपक्रमांचे संयोजन व परीक्षण करतात.
  • टिळक विद्यापीठाच्या संस्कृत परीक्षांच्या संयोजन व परीक्षणात सहभागी.
  • कोथरुड भागामधे गेली १६ वर्षे गीता संथा वर्ग व इतर अध्यात्मिक शैक्षणिक वर्गांचे आयोजन, गीतेतील विविध अध्यायांवर व निरनिराळ्या विषयांवर निरूपण करतात.
  • गीता धर्म मंडळाच्या संपूर्ण गीता कंठस्थ स्पर्धेच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. गीतेव्यतिरिक्त अनेक विषयांवर प्रवचनमाला आहेत.
  • मनोबोध, उपनिषद, शंकराचार्य, गुरुदेव रानडे, योगी अरविंद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, समर्थ रामदासस्वामी ,दासबोध , शबरी, विदुर , गोवंश सुधार विषयांवर प्रवचनमाला आहेत.
  • महाराष्ट्रातील नांदेड , नागपूर ,बारामती , कराड, पंढरपूर ,खोपोली, रोहा , देवरुख , जळगाव येथे व्याख्यान - प्रवचने झाली आहेत.
  • महाराष्ट्राबाहेर गोवा , उज्जैन ,हैद्राबाद इ, श्री. अरविंद आश्रमातर्फे पॉंडेचरी , नैनिताल व हृषीकेश येथे ७-७ दिवसांची स्वाध्याय शिबिरे.
  • पुरस्कार
    गीता कंठस्थ पुरस्कार - शृंगेरी शंकराचार्य यांच्याकडून.
    वाणी वैभव - ज्ञानमयी संस्था, पार्थ सखा गीता धर्म मंडळ, यशोमंगल - गिरगाव
  • मानपत्र - श्री . अरविंद आश्रम